Posts

Showing posts from March, 2022

डोळ्याखाली काळे सर्कल

Image
  डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं तरूण वयात वयस्कर बनवतात. या काळ्या वर्तुळांमुळे समोरच्याला तुम्ही थकलेले किंवा आजारी भासतात.यांनाच डोळ्याभोवती काळी वर्तुळे,   Periorbital circles ,Under eye circles ,Dark circles   असे ही म्हणतात. मेकअपनं काळी वर्तुळ झाकता येत असली तरी हा त्याच्यावरचा परीपुर्ण उपाय नव्हे. डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळे जाण्यासाठी नियमित उपचार करावे लागतात. अर्थात उपचाराचा परिणाम दिसण्यासाठी खूपच संयम ठेवावा लागतो. आता आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने या समस्येचा विचार करु या. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे वात व पित्त दूषित होऊन स्थानसंश्रय भेदाने डोळ्याच्या त्वचेखाली वैवर्ण्य किंवा गडदपणा निर्माण होतो. आपल्या डोळ्यांच्या खाली व गालांच्या वर जी त्वचा असते, ती खूप नाजूक आणि कमालीची पातळ असते. त्या त्वचेला रक्तपुरवठा करणार्‍या खूप सूक्ष्म अशा केशवाहिन्यांचे एक जाळे त्यामध्ये असते. त्या केशवाहिन्यांमधून रक्त वाहताना त्यांच्या बाह्य आवरणातून काही लाल रक्तपेशी बाहेर पडतात आणि त्वचेखाली जमा होतात. केशवाहिनीच्या बाहेर पडलेल्या या पेशी मृत पावतात. त्या ठिकाणी काही किण्वक रस निर...