वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल
* संध्याकाळी लवकर सूर्यास्ताच्या आत किंवा निदान 7 PM पर्यंत जेवावे. (त्यासाठी सकाळी 8 च्या आत हलका नाश्ता -पेज,मउभात,सूप इत्यादी किंवा नाष्टा न करणे व दुपारचे जेवणच 10.30 ते11 पर्यंत घेणे आवश्यक) * संध्याकाळी जेवणानंतर कोणतेही द्रवपदार्थ पाणी,कॉफी,चहा,कॉल्डड्रिंक juice,ice cream इत्यादी न घेणे . लवकर जेवल्यामुळे भूक लागल्यास लाह्या,कुरमुरे,खाकरा, राजगिरा लाडु असे कोरडे पण हलके पदार्थ खावे. *तहान नसताना,जेवणानंतर लगेच, सूर्यास्तानंतर,उगाच अनावश्यक पाणी पिऊ नये.जेवणाच्या आधी पाणी पिल्याने वजन कमी होते. *पाणी नेहमी बसून,भांड्याला तोंड लावून,चहाप्रमाणे घोट घोट प्यावे.उभ्याने बाटलीने गटागटा पाणी पिऊ नये. *उन्हाळ्यात साधे व हिवाळ्यात कोमट किंवा गरम पाणी तहानेनुसार प्यावे.ऋतूनुसार पाण्यात औषधी पदार्थ टाकावे . उदा - उन्हाळ्यात धणे ,जिरे घालून उकळलेले पाणी किंवा पावसाळ्यात सुंठ,नागरमोथा घालून उकळून गाळून घेतलेले पाणी *पोट चेपले जाईल असे व्यायाम करावे. सूर्यनमस्कार,साष्टांग नमस्कार, लोटांगण, प्रदक्षिणा,योगासने(बसून, उभे राहून,पोटावर झोपुन व पाठीवर झोपून ) इत्यादी सर्व प्र...