पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

नुकताच पावसाळा सुरु झाला आहे . साहजिकच सर्वांना पावसात भिजायला आवडते . परंतु या सुखद अनुभवासोबतच आपण वेगवेगळे आजार घेऊन येतो . तसेच हे वातावरण जीवजंतूसाठी पोषक असते . आयुर्वेद शास्त्रानुसार पावसाळ्यामध्ये पाणी आणि वारा दूषित झालेला असतो . त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन साथीचे आजार लवकर पसरतात . पावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य व्याधी म्हणजे ताप , सर्दी , खोकला , जुलाब , अतिसार , उलट्या होणे . पावसाळ्यातील विषाणूजन्य व्याधी म्हणजे मलेरिया , हिवताप , स्वाईन फ्लू , डेंग्यू , चिकन गुनिया , कावीळ , कॉलरा . तसेच पावसाळ्यात सांधेदुखी , अस्थमा , आमवात , पचनाचे आजार , अम्प्लपित्त यांसारख्या जुनाट व्याधीदेखील डोके वर काढू लागतात . योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास वरील आजारांची तीव्रता कमी अधिक प्रमाणात जाणवते . या दूषित वाऱ्यापासून आणि पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून काय करावे , काय खावे , कसे वागावे यासाठी आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या वर्णन केलेली आहे . चला तर जाणून घेऊया पावसाळ्यातील आजारांपासून आपले ...