मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी घ्यावयाची काळजी
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एका विशिष्ट वयामध्ये मासिक पाळी सुरु होते आणि ती एका विशिष्ट वयापर्यंत सुरु राहते. पण मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला तरीही मासिक पाळीच्या अनेक समस्याही महिलांना असतात. मासिक पाळी दरम्यान आपल्या शरीरात बरेच बदल होत असतात जसे कि स्तन हळवे होणे , पोट फुगल्यासारखे वाटणे , डोकेदुखी , झोप न लागणे , चिडचिड , थकवा , थोडे वजन वाढणे , इ . त्रास होतात . ही सर्व लक्षणे शरीरात संप्रेरकांमुळे होणा - या बदलांमुळे असतात . पाळीच्या आधी 1-2 आठवडे हा त्रास होतो . पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक त्रास वाढतात . शारीरिक त्रासही थोडेफार वाढतात . आणखी एक प्रकार म्हणजे पाळी सुरु झाल्याझाल्या ओटीपोटात दुखून येते . हे दुखणे थोडा वेळ टिकून , थांबून थांबून येते . पाळीच्या 3 – 4 दिवसांत हा त्रास चालूच राहतो . परंतु काही पथ्य पाळली तर हा त्रास कमी होऊ शकतो आणि आपणास आराम मिळू शकतो . चला तर जाणून घेऊ मासिक पाळी दरम्यान काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स . ...