मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी घ्यावयाची काळजी

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एका विशिष्ट वयामध्ये मासिक पाळी सुरु होते आणि ती एका विशिष्ट वयापर्यंत सुरु राहते. पण मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला तरीही मासिक पाळीच्या अनेक समस्याही महिलांना असतात.

मासिक पाळी दरम्यान आपल्या शरीरात बरेच बदल होत असतात जसे कि स्तन हळवे होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, झोप लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे, . त्रास होतात. ही सर्व लक्षणे शरीरात संप्रेरकांमुळे होणा-या बदलांमुळे असतात. पाळीच्या आधी 1-2 आठवडे हा त्रास होतो. पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक त्रास वाढतात. शारीरिक त्रासही थोडेफार वाढतात. आणखी एक प्रकार म्हणजे पाळी सुरु झाल्याझाल्या ओटीपोटात दुखून येते. हे दुखणे थोडा वेळ टिकून, थांबून थांबून येते. पाळीच्या 3 – 4  दिवसांत हा त्रास चालूच राहतो. परंतु काही पथ्य पाळली तर हा त्रास कमी होऊ शकतो आणि आपणास आराम मिळू शकतो. चला तर जाणून घेऊ मासिक पाळी दरम्यान काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स.

तीन ते पाच दिवस रक्तस्राव सुरू असणाऱ्या स्त्रीला रज:स्वला असे म्हणतात. या काळामध्ये योनीमार्गातुन रक्तस्त्राव होतो. शारीरिक मानसिक थकवा असतो. अशा वेळेस समागम केल्यास जास्त वेदना होतात आरोग्याच्या दृष्टीने हे त्रासदायक ही असते. या काळात विश्रांती मिळावी म्हणून पुर्वीच्या काळी स्त्रियांना बाजूला बसवले जायचे. परंतु आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, तिला बाजूला बसणे शक्य नाही म्हणून त्रास होतो.

पाळीमध्ये उद्भवणारे  काही दोष त्यांचा परिणाम:

या काळात गर्भाशय आकुंचन पावल्यामुळे किंचित वेदना होतात.

1. आयुर्वेदामध्ये वातप्रकृतीच्या स्त्रियांमध्ये रक्तस्राव अगदी कमी, काळपट रंगाचा वेदनायुक्त असतो.

2. पित्त प्रकृती मध्ये जास्त प्रमाणात लालभडक रंगाचा, वेदनारहित असतो.

3. तर कफ प्रकृतीमध्ये लाल रंगाचा, कफयुक्त, थोडासा बुळबुळीत, मध्यम प्रमाणात वेदनारहित असतो.

 

पाळीमध्ये कोणता आहार घ्यावा?


पाळीमध्ये भूक नैसर्गिकरित्या कमी होते, म्हणून स्त्रियांसाठी या काळात विशिष्ट प्रकारच्या आहाराचे अनुसरण करणे महत्वाचे आहे. या कालावधीमध्ये आहार कसा असावा याबद्दल आयुर्वेदामध्ये काही पथ्ये सांगितलेली आहेत. त्यात असे सांगितलेले आहे कि स्त्रियांनी या काळात पचायला हलके, गरम शिजवलेले अन्न खावे. कारण पचायला जड, थंड आणि कच्चे पदार्थ वात दोष वाढवू शकतात


चला तर जाणून घेऊ काही आयुर्वेदिक टिप्स :  

 

1. पाळी सुरू असताना आहार हलका नेहमी पेक्षा कमी प्रमाणात घ्यावा.

2.  तेलकट तळलेले, मसाल्याचे चमचमीत पदार्थ खाऊ नयेत.

 3. या दिवसात शरीरातील ऊर्जा कमी झालेली असते. आहार जास्त घेतला तर त्याचे पचन व्यवस्थित होत नाही. अपचनामुळे शरीरातील आम निर्मिती होऊन बरेच आजार जडतात, म्हणून शरीराला उत्साह बळ मिळेल असा हलका आहार घ्यावा. भाज्यांचे सूप, शहाळ्याचे पाणी,संत्री,मोसंबी अशा प्रकारच्या फळांचे रस तसेच नाचणीची पेज घ्यावी.

4. शक्यतो जेवण ताजे गरम असावे. पालक,  माठ, चाकवत, राजगिरा भाज्या खाव्यात.

5. टोमॅटो, गाजर यांची कोशिंबीर जीवनसत्वे प्रोटीन युक्त आहार घ्यावा. दूध, कडधान्य ,फळे, भाज्या यांचा समावेश असावा.

6. वेदना कमी करण्यासाठी अजवाईन  गरम किंवा कोमट पाण्यामध्ये  घ्या.

7. तसेच या काळात कोमट  पाणी प्यायल्याने पोटदुखी कमी होऊन मासिक पाळी व्यवस्थित होण्यास मदत करते, पचन सामान्य ठेवते, तसेच भूक आणि चव सुधारते. त्यामुळे शक्यतो कोमट पाणी प्यावे.

8. आहारात काही प्रमाणात तुपाचा समावेश करावा. ते पचनास मदत करते, अपान वात खालच्या दिशेने राखते त्यामुळे उदरपोकळी कमी होऊन मासिक पाळी येण्यास मदत होते. तसेच तूप हे आपले मन शांत करते म्हणून आयुर्वेदामध्ये तूप दररोज सेवन करण्याची शिफारस केली जाते. तसेच महिलांमध्ये  दररोज आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्याने तणाव, चिंता, मनःस्थिती बदलणे, भीती इत्यादीपासून मुक्त होतो.

9. आहारात दूध, जवस असा आहार घ्यावा.

पाळीमध्ये आचरण कसे करावे?

पाळीमध्ये स्त्रियांनी कसे आचरण करावे यासंबंधी काही महत्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. चला तर जाणून घेऊ त्या काय आहेत:

1. स्त्रीने या पाच दिवसांमध्ये आपले मन प्रसन्न ठेवावे.

 2. सकारात्मक विचारांमध्ये मन गुंतवावे.

3. शोक करणे, रडणे, अति श्रमाची कामे टाळावीत. कारण अधिक श्रमामुळे रक्तस्रावाचे प्रमाण वाढते थकवा येतो.

 4. दिवसा झोपणे टाळावे, कारण यामुळे कफ वाढून स्त्रोतसा मध्ये अडथळा निर्माण होतो. अनेक आजार जडतात. शरीराची स्वच्छता राखावी.

 5. सकाळी आंघोळ करावी दर तीन ते चार तासांनी पॅड बदलत राहावे.  

6. स्त्रियांनी या काळात अधिक श्रम करू नये. तसेच अधिक  वजन उचलू नये. खेळणे, धावणे,  पोहणे इत्यादी क्रिया करू नये. शक्य तेवढा आराम करावा.

7. पाळीच्या जागेची स्वच्छता ठेवावी.

8. रोज कोमट पाण्याने स्नान करावे   स्नान करताना कंबर, पाळीची जागा गरम पाण्याने शेकावी.

9. अंग जास्त चोळू नये त्यामुळे रज स्रावचे प्रमाण कमी होते.

10. चौथ्या दिवशी डोक्यावरून स्नान करावे.

11. शुभ्र वस्त्र परिधान करावे.

12. अलंकार धारण करावे.

ही परिचर्या पाळल्यास महीलांमध्ये पाळीच्या तक्रारी होत नाहीत. नकोशी असणारी पाळी आपलीशी वाटायला लागते.

 

अशाच उपयोगी माहीतीसाठी  संपर्क करा - 7796775000 

डॉ. अविनाश देवरे

श्री साई आयुर्वेदिक क्लिनिक

पत्ता : कोहिनुर आर्केड , मजला , शॉप नं ११६

टिळक चौक , निगडी पुणे-४४

वेबसाईट: http://infertilityayurved.in/Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थायरॉईड व त्यावरील आयुर्वेदिक उपाय

अभ्यंग और दिवाली