Posts

Showing posts from July, 2020

च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Image
च्यवनप्राशला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे . च्यवनप्राश बनवण्यासाठी आवळा   व इतर   40   रसायनद्रव्ये , रक्तशुद्धीकर द्रव्ये व त्रिदोषशामक द्रव्ये वापरली जातात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात . च्यवनप्राश हे लहान   मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे . च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरले जाणारे घटक उत्कृष्ट प्रतीचे असणे आवश्यक असते शिवाय ते बनवण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करावा . च्यवनप्राशचा मुख्य घटक हा आवळा आहे . आवळा हे एक उत्तम प्रकारचे व सहज उपलब्ध होणारे आयुर्वेदिक हे   औषध आहे . आयुर्वेदामध्ये आवळ्याला वयःस्थापन द्रव्य मानले जाते . त्यामुळे वाढत्या वयामुळे शरीराची होणारी झीज कमी प्रमाणात व्हावी व तारुण्य टिकवण्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे .   भारतीय संस्कृतीमध्ये च्यवनप्राशला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे . त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर...