च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे



च्यवनप्राशला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. च्यवनप्राश बनवण्यासाठी आवळा  इतर 40 रसायनद्रव्ये, रक्तशुद्धीकर द्रव्ये त्रिदोषशामक द्रव्ये वापरली जातात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात. च्यवनप्राश हे लहान  मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे. च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरले जाणारे घटक उत्कृष्ट प्रतीचे असणे आवश्यक असते शिवाय ते बनवण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करावा.

च्यवनप्राशचा मुख्य घटक हा आवळा आहे. आवळा हे एक उत्तम प्रकारचे सहज उपलब्ध होणारे आयुर्वेदिक हे  औषध आहे. आयुर्वेदामध्ये आवळ्याला वयःस्थापन द्रव्य मानले जाते. त्यामुळे वाढत्या वयामुळे शरीराची होणारी झीज कमी प्रमाणात व्हावी तारुण्य टिकवण्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे.  भारतीय संस्कृतीमध्ये च्यवनप्राशला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर याचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात करण्याचा सल्ला देतात. चला तर जाणून घेऊया च्यवनप्राशचे खाण्याचे मुख्य फायदे कोणते आहेत त्याचे सेवन कसे करावे:

च्यवनप्राश सेवन करण्याचे काही नियम:

बरेच वेळी लोकांचा गैरसमज असतो कि च्यवनप्राश केवळ हिवाळ्यामध्ये सेवन करावे. परंतु, आयुर्वेदामध्ये याला संपूर्ण वर्षभर सेवन करण्याच्या सल्ला दिला गेला आहे. 5 वर्षाखालील मुलांना पाव चमचा, 10 वर्षाखालील मुलांना अर्धा चमचा त्यानंतर 1 चमचा याप्रमाणे च्यवनप्राश दररोज सेवन करावे. वयाच्या पस्तिशीनंतर त्यात चांदी, सुवर्ण अशी द्रव्ये मिसळून तयार केलेले च्यवनप्राश सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. गर्भवती स्तनपान देणाऱ्या महिलांनी देखील याचे सेवन करावे. त्यामुळे मुलांना आवश्यक ती पोषकतत्त्वे मिळण्यास मदत होते. परंतु च्यवनप्राश तुपासोबत घेऊ नये. कारण तूप हा च्यवनप्राश चा एक घटक आहे. त्यामुळे तुपासोबत घेतल्याने वजनवाढीची समस्या उद्भवू शकते.

च्यवनप्राश कोणत्या वेळी सेवन करावे?

आयुर्वेदामध्ये च्यवनप्राश कोणतेही आयुर्वेदिक औषध सकाळी घेणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. आयुर्वेदिक डॉक्टर च्यवनप्राश सकाळी रिकामे पोटी खाण्याचा सल्ला देतात. नाश्त्यापूर्वी एक चमचा च्यवनप्राश गरम दुधासोबत घेतल्याने याचा चांगला फायदा होतो. तसेच झोपण्यापूर्वीदेखील आपण चमचा च्यवनप्राश गरम दुधासोबत घेऊ शकतो.

च्यवनप्राश सेवन करण्याचे फायदे:

1. ह्यात Vit A आणि Vit C चे प्रमाण असते .

2. ह्याचे  सेवन केल्याने प्राणवह स्रोतसांचे (फुफ्फुसांचे) रोग दूर ठेवण्यास मदत होते( जसे - सर्दी, खोकला)

3. च्यवनप्राश सेवन केल्याने व्याधीक्षमत्व वाढते. (Immunity Booster.)

4. रोज सेवन केलेल्या अन्नाचे पचन नीट होण्यास मदत करते.

5. ह्याच्या  सेवनाने तारुण्य टिकवण्यासाठी मदत होते.(Anti Ageing).

6. बुद्धी वर्धक असल्याने लहान मुलांसाठी उपयुक्त आहे.

7. Tonic for reproductive System.

8. परीपुर्ण शारीरीक वाढीसाठी उपयुक्त.

9. श्वसनाच्या समस्या कमी करते

10. रोगप्रतिकारशक्ती सुधारते

11. स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या दूर करते पाळी नियमित करण्यासाठी मदत करते.

12. ब्लड प्रेशर नियंत्रित करते

13. रक्त शुद्ध करते, हीमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते

14. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते

😃स्वस्थ रहा मस्त रहा😃

अशाच उपयोगी माहीतीसाठी  संपर्क करा - 7796775000 

डॉअविनाश देवरे

श्री साई आयुर्वेदिक क्लिनिक

पत्ता : कोहिनुर आर्केड , मजला , शॉप नं ११६

टिळक चौक , निगडी पुणे-४४

वेबसाईट: http://infertilityayurved.in/


Comments

Popular posts from this blog

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी घ्यावयाची काळजी

Home Remedies for Arthritis ( Marathi )

थायरॉईड व त्यावरील आयुर्वेदिक उपाय