थायरॉईड व त्यावरील आयुर्वेदिक उपाय
थायरॉईड म्हणजे काय ? थायरॉईड ही एक बटरफ्लाय सारख्या आकाराची लहान ग्रंथी असते , जी मानेच्या खालच्या भागात असते . तिचे काम शरीराची चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवणे असते . ही चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवण्यासाठी थायरॉईड संप्रेरकांचे उत्सर्जन करत असते . जे शरीरातील पेशींना उर्जेचा वापर कसा करायचा ते सांगते . संप्रेरकांचे उत्सर्जन झाल्यानंतर त्याचा वापर शरीर करते . ही प्रक्रिया सतत सुरु राहते . जर ही प्रक्रिया बिघडली तर थायरॉईडचा त्रास बळावतो . म्हणजेच शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त संप्रेरके तयार करते आणि उर्जेत रुपांतर झालेल्या संप्रेरकांचा अधिक वापर केला जातो त्यावेळी तुम्हाला थायरॉईड हा आजार बळावतो . भारतामध्ये थायरॉईड हा आजार प्रत्येक 10 मधील एकाला झालेला आढळून येतो . हा आजार पुरुषांपेक्षा अधिक स्त्रियांमध्ये पाहायला मिळतो . बदलेली जीवनशैली , धावपळ , मानसिक तणाव हि काही थायरॉईड ची प्रमुख करणे आहेत . स्त्रियांमध्ये मासिक पाळी , गर्भावस्था या सगळ्यामुळे हार्मोन्स ...