Posts

Showing posts from December, 2021

ओवा खाण्याचे फायदे

 " ओवा " स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व खुप असते.याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा.ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो.आयुर्वेदानुसार ओवा पचनक्रीया सुधारते. हे कफ, पोट, छाती चे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे.यासोबतच उचकी,ढेकर या आजारांसाठी फायदेशीर असते. ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लोविन, थायमिन, निकोटिनिक अॅसिड कमी प्रमाणात, थोड्या प्रमाणात आयोडिन, साखर, सेपोनिन, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये मिळणारे सुगंधीत तेल 3-4 टक्के असते, 5 ते 6 टक्के मुख्य घट थाइमोल असते. 1. पोट बिघडल्यावर ओवा चावुन खावा. यानंतर एक कप गरम पाणी प्या. 2. 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम काळे मीठ, 2 ग्रॅम जीरे चांगल्या प्रकारे मिश्रण करा. या मिश्रणातील 3 ग्रॅम प्रमाण कोमट पाण्यत टाकुन दिवसातुन 4-5 वेळा घ्या. पोट दुखी होणार नाही. 3. पोटात जंतु असतील तर काळ्या मीठासोबत अर्धा चमचा ओवा खा. हे काही वेळा नियमित खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतील. 4. 3 ग्रॅम...

वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

Image
  *  संध्याकाळी लवकर सूर्यास्ताच्या आत किंवा निदान 7 PM पर्यंत जेवावे. (त्यासाठी सकाळी 8 च्या आत हलका नाश्ता -पेज,मउभात,सूप इत्यादी किंवा  नाष्टा न करणे व दुपारचे जेवणच 10.30 ते11 पर्यंत घेणे आवश्यक) * संध्याकाळी जेवणानंतर कोणतेही द्रवपदार्थ पाणी,कॉफी,चहा,कॉल्डड्रिंक juice,ice cream इत्यादी न घेणे . लवकर जेवल्यामुळे भूक लागल्यास लाह्या,कुरमुरे,खाकरा, राजगिरा लाडु असे कोरडे पण हलके  पदार्थ खावे. *तहान नसताना,जेवणानंतर लगेच, सूर्यास्तानंतर,उगाच अनावश्यक पाणी पिऊ नये.जेवणाच्या आधी पाणी पिल्याने वजन कमी होते. *पाणी नेहमी बसून,भांड्याला तोंड लावून,चहाप्रमाणे घोट घोट प्यावे.उभ्याने बाटलीने गटागटा पाणी पिऊ नये. *उन्हाळ्यात साधे व हिवाळ्यात कोमट किंवा गरम पाणी तहानेनुसार प्यावे.ऋतूनुसार पाण्यात औषधी पदार्थ टाकावे . उदा - उन्हाळ्यात धणे ,जिरे घालून उकळलेले पाणी किंवा पावसाळ्यात सुंठ,नागरमोथा घालून उकळून गाळून घेतलेले पाणी *पोट चेपले जाईल असे व्यायाम करावे. सूर्यनमस्कार,साष्टांग नमस्कार, लोटांगण, प्रदक्षिणा,योगासने(बसून, उभे राहून,पोटावर झोपुन व पाठीवर झोपून ) इत्यादी सर्व प्र...