आवळा खाण्याचे फायदे
### आवळा…आमलकी…. आयुर्वेदात आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानले आहे. संस्क्रृतमध्ये-आमलकी, व इंग्रजित-एम्ब्लिका मायरोबेलान असे म्हणतात.. आवळा हा शरीर पोषणाचं काम करतो म्हणून आयुर्वेदात याला .. “धात्रि”म्हणतात.. वार्धक्य अवस्था टाळुन चिरतरुण ठेवतो म्हणून याला “वयस्था” असेही म्हणतात.. आवळा हा रक्तदोषहारक, पित्तशामक,सारक व रूचकर आहे.. …. ..###आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्याने शरिरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. रक्तविकारात उदा.-नाकाचा घोळणा फुटला असेल तर,शौचातुन रक्त जात असेल तर, मूळव्याधितून रक्त जात असेल तर, तसेच स्रियांच्या मासिक पाळीत अतिरक्तस्राव होत असेल तर. आवळाचूर्ण , आवळारस घेतल्यास आराम पडतो.. ।। आयुर्वेद।।…🍈 जर डोकेदुखीचा त्रास असेल तर, आवळ्याच चूर्ण, तूप व खडिसाखर समप्रमाणात घेऊन सकाळी अनशापोटी घ्यावे.त्वरित आराम पडतो. केसांच्या तक्रारीवर उदा.. केस गळण,पांढरे होणे, कोंडा होणे,टक्कल,केस रूक्ष होणे या सर्वावर आवळा,शंखपुष्पी,जास्वंद, यानीयुक्त तेल केसांना लावावे.. काही दिवसातच केसांची वाढ होते, केस गळण थांबत व केसांचा रंग टिकतो...