आवळा खाण्याचे फायदे
### आवळा…आमलकी….
आयुर्वेदात आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानले आहे. संस्क्रृतमध्ये-आमलकी, व इंग्रजित-एम्ब्लिका मायरोबेलान असे म्हणतात.. आवळा हा शरीर पोषणाचं काम करतो म्हणून आयुर्वेदात याला .. “धात्रि”म्हणतात.. वार्धक्य अवस्था टाळुन चिरतरुण ठेवतो म्हणून याला “वयस्था” असेही म्हणतात.. आवळा हा रक्तदोषहारक, पित्तशामक,सारक व रूचकर आहे..
…. ..###आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्याने शरिरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. रक्तविकारात उदा.-नाकाचा घोळणा फुटला असेल तर,शौचातुन रक्त जात असेल तर, मूळव्याधितून रक्त जात असेल तर,
तसेच स्रियांच्या मासिक पाळीत अतिरक्तस्राव होत असेल तर. आवळाचूर्ण , आवळारस घेतल्यास आराम पडतो..
।। आयुर्वेद।।…🍈
जर डोकेदुखीचा त्रास असेल तर, आवळ्याच चूर्ण, तूप व खडिसाखर समप्रमाणात घेऊन सकाळी अनशापोटी घ्यावे.त्वरित आराम पडतो. केसांच्या तक्रारीवर उदा.. केस गळण,पांढरे होणे, कोंडा होणे,टक्कल,केस रूक्ष होणे या सर्वावर आवळा,शंखपुष्पी,जास्वंद, यानीयुक्त तेल केसांना लावावे.. काही दिवसातच केसांची वाढ होते, केस गळण थांबत व केसांचा रंग टिकतो.. व रात्रि शांत झोप येते..
तोंड बेचव होऊन मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध याचे चाटण घ्यावे.तोंडास रूचि येते..###आवळा,हिरडा,बेहडा,जांभूळ बी,कडुलिंबाच चूर्ण,गुळवेल व कारली सुकवून त्यांची पूड समप्रमाणात घेतल्यास .. मधुमेह हा आजार आटोक्यात राहतो.. हे चूर्ण सकाळ संध्याकाळ रूग्णाने १-१ चमचा घ्यावं.. नियमित आवळा सेवन केल्यास शरिरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामूळे कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी राहून ह्रुदयविकार टाळता येतो..
।। आयुर्वेद।।🍈..
पोटात जंत झाल्यास एक चमचा आवळ्याचा रस व एक चमचा ओल्या नारळाचे दूध एकत्र करून जेवणापूर्वी, १:५ महिना घेतल्यास जंत पडतात.आव,जुलाब, अपचन या विकारावर,आवळ्याच्या रसात सुंठ पुड घालून ते चाटण दोन्ही जेवणापूर्वी १ महिना घ्यावे.
एका आवळ्यातील जीवनसत्व ४० संत्र्याची बरोबरी करतं.एक आवळा रोज खाल्याने रक्तवाहिन्या मजबूत होतात. उन्हामूळे डोळ्यांची आग होते.डोळे थकतात, अश्या वेळी आवळ्याच्या बियांच्या काढ्याने जर डोळे धुतले तर डोळे सशक्त,निरोगी होतात..
आवाज बसला असेल तर आवळ्याचे चूर्ण मधात मिसळून घ्या.उचकी किंवा श्वास लागत असेल तर आवळ्याचा रस व पिंपळाचे चूर्ण एकत्र करून घेतात.खरूज झाल्यास आवळकाठी जाळुन ती तेलात खलून त्याचा लेप फोडांवर लावावा..
चेहर्यावर सुरकुत्या पडु नये म्हणून आवळकाठी पाण्यात वाटुन ती चेहर्याला लावावी.
।। आयुर्वेद।। 🍈
वातामूळे होणार्या सांधेदुखीत एक चमचा आवळा चूर्ण व एक चमचा गुळ एकत्रित करून आल्याच्या रसासोबत घेतल्यास आराम पडतो..आवळा,हिरडा,बेहडा ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन याचे चूर्ण बनवतात. यालाच त्रिफळा चूर्ण म्हणतात.. हे रोज पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी गाळावे व याने डोळे धुवावे.याने डोळ्याचे तेज वाढतं.. तसेच रात्री झोपतांना गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतल्यास सकाळी शौचास साफ होते.
……..नियमितपणे आवळा सेवन केल्यास. त्यात असणार्या रोगप्रतिकार शक्ति मूळे ह्रदय,केस,मांसपेशी व शरिरातील अनेक ग्रंथिंना बळ मिळून माणुस तरूण राहतो. म्हणुनच वार्धक्यावस्था टाळण्यासाठी च्यवनऋषिंनि आवळ्यापासून बनवलेला च्यवनप्राशावलेह सेवन केला व तारुण्यप्राप्त करून घेतले..
….। तेव्हा आवळ्याचे हे गुणधर्म बघता सर्वानीच बाराही महिने कोणत्याही स्वरुपात आवळा खाल्लाच पाहीजे…
!!!धन्यवाद!!!
* आरोग्य तज्ज्ञ *
वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)
श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44.
Comments
Post a Comment