केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय
रोज काही प्रमाणात केस गळणे हे सामान्य आहे,परंतु जेव्हा केस हे गुच्छांमध्ये गळणे सुरू होते, तेव्हा याचा अर्थ पोषक तत्वांची कमतरता किंवा अयोग्य जीवनशैली जसे कि जास्त ताण, अपुरी झोप किंवा धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी असतात,तसेच हार्मोनचे असंतुल. बऱ्याच वेळा, आपल्या केसांची आणि त्वचेची स्थिती आपल्या आतील शरीराची स्थिती दर्शवते. म्हणूनच, केस गळती रोखण्यात पोषण महत्वाची भूमिका बजावते. केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय क्र. १ :- * कढीपत्ता:- हा भारतीय स्वयंपाक घरातील एक सामान्य मसाला आहे, जो आरोग्यासाठी विशेषतः केसांसाठी उत्तम आहे. कढीपत्ता हा बीटा-कॅरोटीन,प्रथिने, लोह,कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरसचा समृद्ध स्रोत आहे. कडीपत्त्यामुळे केस गळती रोखली जाऊन अकाली पांढरे होण्यापासून देखील त्यांचा बचाव होतो.केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्त्याचा वापर आहारात तर महत्त्वाचा आहेच परंतु, त्या व्यतिरिक्त तुम्ही कडिपत्यांपासून खालीलप्रमाणे वेगवेगळे हेअर मास देखील बनवून लावू शकता. १) कढीपत्ता आणि दही हेअर मास्क:- कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात केसांच्या लांबीनुसार दही घाला व हा मास्क केसांना